अतनूर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर, मेवापूर, चिचोंली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या. जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्ताने विविध ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक जिलानी शेख, दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे, उपसरपंच बाबुराव कापसे, ग्रामपंचायत सदस्य प्रभुदास गायकवाड, विठ्ठल बारसुळे, गणेश गायकवाड, प्रमोद संगेवार, कर्मचारी गुंडू बोडेवार, किशन बारसुळे, खंडू गायकवाड उपस्थित होते. चिंचोलीच्या सरपंच सौ.रेखा बिरादार, उपसरपंच राजेंद्र बंडरे, ग्रामसेवक जिलानी शेख, माजी सरपंच संतोष निवृती बट्टेवाड, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी, पक्षीमित्र व वन्यजीव संरक्षण सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय गिरी, बिरादार, गणपती हुंजे, संगीता गिरी, पुष्पा संतोष बट्टेवाड, प्रतिमा गायकवाड, श्याम हुंजे, स्नेहा गायकवाड, सुनीता बिरादार, ग्रामसेवक विजयकुमार भोसले, युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव विनायकराव केंद्रे उपस्थित होते. मेवापूर येथे ग्रामसेवक दिनकर कबाडे, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सौ.गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर/अतनूरच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरच्या कार्यालयात उपाध्यक्ष राजकुमार कापडे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था महाराष्ट्र राज्य कार्यालयात संस्थापक राज्याध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर व व्यंकटेश शिंदे, वसुंधरा महिला मंडळ कार्यालयात अध्यक्षा सौ.रुक्मिणी सोमवंशी, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या कार्यालयात अध्यक्षा सौ. सध्या शिंदे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरच्या कार्यालयात बी.जी.शिंदे, राजीव अतनूरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख, डॉ.भक्ती कोळ्ळे, वरिष्ठ लेखापाल पांडुरंग सुर्यवंशी, आरोग्य सहाय्यक सलमान शेख, दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, भाजपाचे जळकोट तालुका उपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, चंदर गायकवाड, माधव सोमुसे, सुरेजी येवले यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

Post a Comment
0 Comments