Type Here to Get Search Results !

वाकान येथील दुधगाळ नाल्यावरील पुल पहिल्याच पुरात गेले वाहून! प्रशासन मात्र गाढ झोपेतच!



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

तालुक्यातील पुसद मतदार संघात शेवटच्या टोकावर येत असलेल्या मौजा वाकान ता.महागाव येथील दुधगाळ नाल्यावरील पुल पहिल्याच पुरात वाहून गेल्याने हा मार्ग बंद पडला असुन प्रशासन मात्र गाढ झोपेतच असल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे काल दिनांक ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधगाळ नाल्यावर पुराने थैमान घातल्याने हा पुल पूर्णपणे वाहुन गेल्याने हा मार्ग अक्षरशा बंद पडला आहे सन २०२५ मध्ये आगष्ट सप्टेंबर महिन्यात पुरामुळे या पुलाचा दर्जा खालवल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पाहणी करुन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन वांझोटे ठरल्याने येथील ग्रामस्थांमधून नाराजीचे सूर छेडले जात आहे या नाल्यावरील पुल पूर्णपणे जीर्ण झाल्याने पहिल्याच पुरात वाहून गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे या मार्गावरून वाकान कोदंरी येथील अनेक शेतकऱ्यांची शेती माळपटारावर जोडली जात असल्याने व हा एकमेव मार्ग बंद पडल्याने प्रशासनाने तात्काळ घबरदारी घेण्याची गरज असल्याचे या परिसरातील नागरिकांमधुन बोलल्या जात आहे अघापही या परिसरात कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिरकुनही न पाहिल्याने प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या गाढ निद्रेत आहेत की काय असा प्रश्न? उपस्थित केला जात असुन या मतदार संघातील आमदार खासदारांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून हा मार्ग सुरक्षित सुरू करन्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments