नांदलापूर (ता. कराड) –
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नांदलापूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय शिंदे आण्णासाहेब,शिक्षक शेखर शिर्के सर,अनिल शिर्के सर यांच्या श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर प्रशासक मानसिंगराव लावंड आप्पा यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षक हे समाजाला दिशा देणारे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले.तसेच ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि ग्रामसेवक यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना व्यक्त केली.उपस्थितांनी सत्कारमूर्तींना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी सुखशांती सार्वजनिक वाचनालयाच्या कायदेशीर सल्लागार ॲड.प्रजाक्ता शिर्के,शेखर शिर्के,ग्रामविकास अधिकारी विजय शिंदे,यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्रदिप शिर्के दादा,स्वरूप निकम,अंगणवाडी शिक्षिका मंगल घारे,संगणक परिचारिका सानिका थोरात,राजाराम शिर्के,प्रकाश ढेबे,ग्रामपंचायत सदस्य,युवक,महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक लावंड यांनी केले तर आभार स्वरुप निकम यांनी मानले.

Post a Comment
0 Comments