Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,मलकापूर येथे भक्तिमय वातावरणात गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा



मलकापूर (प्रतिनिधी): 

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,श्री दत्त मंदिर मलकापूर येथे गुरु पौर्णिमेचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन,पाद्यपूजन,आरती व नामजपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी स्वामी भक्तांनी"श्री स्वामी समर्थ"नामाचा अखंड गजर करत गुरुतत्त्वाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध धार्मिक कार्यक्रम,पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन आणि सामूहिक प्रार्थनेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.उपस्थित भाविकांनी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत स्वामी समर्थ सेवेकरी यांचेकडून स्वामी समर्थ महाराज अभिषेक व गुरुपद घेऊन समाजात धार्मिक सेवा,सदाचार,प्रेम आणि मानवतेचा संदेश देण्याचा संकल्प केला.सायंकाळी ६ च्या आरतीच्या कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या उत्सवात मलकापूर तसेच परिसरातील मोठ्या संख्येने स्वामी भक्तांनी उपस्थित राहून गुरु पौर्णिमा उत्सव यशस्वी केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.उपस्थित भाविकांनी आयोजकांचे कौतुक करत हा सोहळा भक्ती,श्रद्धा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी उत्सव ठरल्याची भावना व्यक्त केली.

Tags

Post a Comment

0 Comments