Type Here to Get Search Results !

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त झारगडवाडीत वृक्षारोपण



ज्योतिबानगर स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी निधी देणार : पंचायत समिती सभापती किरण तावरे

राहुल चव्हाण -प्रतिनिधी 

झारगडवाडी : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त झारगडवाडी येथील ज्योतिबानगर परिसरातील स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी वृक्षांचे संगोपन व संरक्षण होण्यासाठी स्मशानभूमी परिसराला कंपाऊंड करण्यासाठीही निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे परिसराच्या सुशोभीकरणासह वृक्षसंवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप तात्या बांदल, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, मार्केट कमिटी अध्यक्ष विनायक गावडे, मार्केट कमिटी सदस्य दयाराम महाडिक, छत्रपती साखर कारखाना संचालक संतोष मासाळ, नारायणराव कोळेकर, शरद आगवणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, पंचायत समिती सदस्य भूषण टकले, सरपंच अजित बोरकर, पद्मनाभ निकम,नितीन शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव निकम, गोरख बोरकर,चंद्रकांत बोरकर, निलेश कालगांवकर, मंगेश मासाळ, अभि बिचकुले, नवनाथ कोकणे, संजय जगताप, राहुल साळुंखे, विशाल जाधव, गणेश चंद्रकांत बोरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अंकुश निकम व मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला हा उपक्रम गावाच्या सामाजिक व पर्यावरणपूरक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला.

 



Post a Comment

0 Comments