दवंडी वार्तापत्र महागांव
तालुका प्रतिनिधी विवेक राजेंद्र नरवाडे
महागांव:
तालुक्यात काल दिनांक २५/०८/२०२६ रोजी शिवसेना युवा सेना आघाडीच्या वतीने शिवसेना पश्चिम विदर्भ सह संपर्क प्रमुख श्री पराग भाऊ पिंपळे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहड, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री राजुदास जाधव व जिल्हा प्रमुख यशवंत पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्याच्या ठिकाणी शिवसेनची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी काल ठिक १२.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय महागांव येथे कार्यकारिणी गठित करण्यात आली यावेळी वाकान येथील तडफदार नेतृत्व व आपल्या पक्षाच्या हितासाठी तळमळीने कार्य करणारे युवा श्री केतन बाळु राठोड यांची महागांव तालुका पोखरी गणातुन युवा शिवसेना विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.या निवड प्रक्रियेत केतन राठोड यांना युवा शिवसेना विभाग प्रमुखपदाचे नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी युवा शिवसेना विभाग प्रमुख म्हणून आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी तळमळीने व एकनीष्ठेने पार पाडणार असल्याचे मत केतन राठोड यांनी व्यक्त केले तसेच प्रमोद भाउ भरवाडे व शिवसेना तालुका प्रमुख राजु राठोड यांच्या नेतृत्वात हि संधी मिळाल्याने केतन राठोड यांनी त्यांचे आभार मानले यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments