४४ झाडे जप्त, १९ हजार ४५० चा मुद्देमाल हस्तगत; शेतमालकावर गुन्हा दाखल
दारव्हा तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील नायगाव येथे चक्क शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने छापा टाकून गांजाची तब्बल ४४ झाडे जप्त केली. या कारवाईत १९ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दारव्हा उपविभागात गस्त घालत असताना नायगाव परिसरात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने नायगाव शिवार गाठून संबंधित शेतात छापा टाकला. शेत सर्व्हे क्रमांक १६/०१ मध्ये गांजाची ४४ झाडे लावलेली आढळून आली.
या प्रकरणी मिलिंदचंद आत्माराम राठोड (रा. नायगाव, ता. दारव्हा) याच्याविरुद्ध दारव्हा पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८ (ब), २० (अ) (i) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे व त्यांच्या पथकाने केली

Post a Comment
0 Comments