Type Here to Get Search Results !

पुणेकरांची अस्मिता, पुणेकरांचा जिव्हाळा… MH 12 पुन्हा सुरू होणार!



हवेली तालुका प्रतिनिधी पुणे 

 केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांची भेट घेऊन पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा केली. MH 61 नको, आम्हाला पुन्हा MH 12 हवे! कारण MH 12 हा केवळ वाहनांचा नोंदणी क्रमांक नसून पुणेकरांची अस्मिता, ओळख आणि भावनिक जिव्हाळ्याचा विषय आहे.यावेळी श्री. योगिराज बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक आघाडी पुणे यांनी परिवहन विभागामार्फत MH 12 ही वाहन नोंदणी मालिका पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही विनंती केली.

यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णांनी सकारात्मक भूमिका मांडताना सांगितले की, पुढील तीन ते चार महिन्यांत MH 61ही मालिका बंद होऊन पुन्हा MH 12 मालिका सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसेच सध्या MH 61 क्रमांक असलेल्या वाहनधारकांना कमी शुल्कात MH 12 क्रमांक उपलब्ध करून देण्याबाबतही परिवहन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्याशी चर्चा सुरू असून, लवकरच पुणेकरांच्या भावना आणि अस्मिता जपण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अण्णांनी दिले.

या विषयासाठी मार्गदर्शन श्री चंद्रकांत दादा पाटील ,बाळाभाऊ भेगडे , प्रदीपदादा कंद ,गणेश तात्या भेगडे , धीरजभाऊ घाटे , सौ जयश्री ताई पलांडे , संदीपआप्पा भोंडवे , दादासाहेब सातव पाटील , रवींद्रभाऊ कंद , रमेश परदेशी , योगेश सुपेकर ,अमित सोनवणे यांचे सहकार्य लाभत आहे:MH 12 हा केवळ नंबर नाही, तर पुणेकरांच्या अभिमानाची ओळख आहे!पुणेकरांची भावना जपण्यासाठी हा प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.


Post a Comment

0 Comments