Type Here to Get Search Results !

उरळगावच्या मा. सरपंच सौ सारिकाताई जांभळकर आदर्श पुरस्काराने सन्मानित!



स्वरूप गिरमकर  तालुका प्रतिनिधी शिरूर 

शिरूर : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील माजी सरपंच सौ. सारिकाताई गजानन जांभळकर यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श सरपंच पुरस्कार पत्रकार भवन पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार नालंदा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी,विविध क्षेत्रातील सत्कारमूर्ती यांच्या उपस्थितीत देण्यात आला.सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सौ सारिकाताई जांभळकर यांना गौरवण्यात आले. उरळगाव येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच असताना सारिकाताई जांभळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आदर्श सरपंच सुनिल सात्रस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कार्यकाळात गावात राबवल्या. याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल उरळगाव परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्कार सोहळ्याला आदर्श सरपंच सुनिल शेठ सात्रस, माजी उपसरपंच शशिकांत कोकडे, उद्योजक अविनाश सात्रस,बाळासाहेब सात्रस,अविनाश जांभळकर, शरद जांभळकर, अमोल धरणे(मा.सरपंच वाघाळे),बाबाजी सात्रस,अविनाश कुदळे,सनी भोसले, हिरामणशेठ इंगळे,विकास कुदळे,संतोष होलगुंडे, संदीप जांभळकर, भगवान होलगुंडे,युवराज जांभळकर, नवनाथ बिचकुले, बजरंग पिंगळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments