सिंदखेडा : तालुक्यातील कुरुकवडे गावात नंदुरबार येथील कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्न कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत म्हणून दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाची सुरवात कृषिदुतांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती म्हणजे कृषी शिक्षण दिवस साजरा करून केली. कार्यक्रमास जिल्हा परिषद केंद्र शाळा, कुरुकवडे येथील मुख्याध्यापक श्री. जयेंद्र सूर्यवंशी तसेच श्री. पवार व श्री. गिरासे उपस्थित होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी संलग्न कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत शेतकऱ्यांकडून माहितीची देवान घेवाण करणार आहेत, तसेच शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच अन्य कृषी विद्यापीठानी तयार केलेल्या पिकांच्या नवीन वाण, तसेच एकात्मिक किड, रोग व तण व्यवस्थापन, शेतीतील नवीन तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीचे महत्त्व अश्या विषयांवर विविध प्रात्यक्षिकांचे माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.या कृषिदुतांमध्ये चौधरी वामन, बागुल मंगेश, गावित हितेश, कोकणी जगदीश, पवार पंकज, गावंडे महेश या कृषिदुतांचा समावेश आहे.
शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले, ग्रामीण कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्न कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. एस. यु. बोराळे सर व कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. के. बलसाने यांचे कृषीदुतांना मार्गदर्शन लाभले. तर या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच श्रीमती. वर्षा पाटील, उपसरपंच श्री. रोहित पाटील व गावाकऱ्यांनी सहकार्य करण्याची हमी दिली.

Post a Comment
0 Comments