Type Here to Get Search Results !

श्री यशवंत किसान माध्यमिक शाळेत स्नेह संमेलन उत्साहात ‌.



रत्नापिंप्री ता पारोळा : शरद पाटील :: 

 येथील श्री यशवंत माध्यमिक विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत दि.७/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कलारंग वार्षिक स्नेह संमेलनाचा (गॅदरिंग) कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विश्वासरावजी पाटील गटशिक्षणअधिकारी, पंचायत, समिती पारोळा कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुनीलजी पवार साहेब पोलीस निरीक्षक,पारोळा पोलीस स्टेशन हे होते तसेच प्रमुख पाहुणे चंद्रकांत चौधरी अधिक्षक शापोआ पारोळा यांची उपस्थिती होती.विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम बघण्यासाठी गावातील सर्व माता पालक, माता भगिनी, प्रत्येक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी  देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमांची रूपरेषा एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी होती.असा कार्यक्रम फक्त पारोळा अमळनेर या अशा ठिकाणी इंग्लिश मीडियम या ठिकाणी होत असतो मात्र एका खेडेगावात त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील  शाळेतील शिक्षक, शिक्षिका  शिक्षकेतर कर्मचारी तसेच संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले होते आणि तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्यात आला अनेक प्रकारचे अहिराणी, मराठी, हिंदी आदिवासी गीते व्यसनमुक्ती नाटिका तसेच संत गोरा कुंभार यांच्यावर देखील कार्यक्रम करण्यात आला मुला-मुलींनी देखील चांगल्या प्रकारचे नृत्य सादर केले त्यांचे उपस्थित मान्यवर खूप खूप कौतुक केले

Post a Comment

0 Comments