Type Here to Get Search Results !

चिंचोली, गुत्ती, मेवापूर, गव्हाण, अतनूर येथे संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन



अतनूर / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा महाराज यांची ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली, अतनूर, गव्हाण, मेवापूर, गुत्ती येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी गावातील सरपंच रेखा बिरादार, उपसरपंच राजेंद्र भंडारे, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष बट्टेवाड, ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रतिमा गायकवाड, गणपती हुंणजे, दत्ता बिरादार, संगीता गिरी, पुष्पा बट्टेवाड, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष शुभान गायकवाड, गावातील प्रतिष्ठित नागरिक गोपाळ गव्हाणे, उत्तम गव्हाणे, संग्राम बिरादार, संजय गायकवाड, दत्तात्रय गिरी, ग्रामपंचायत ऑपरेटर स्नेहा गायकवाड, रोजगार सेवक शाम हुंणजे, ग्रामपंचायत सेवक सुनीता बिरादार, अतनूर ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबुराव कापसे, ग्रामसेवक फिरोज शेख, गव्हाण येथे सरपंच बालाजी गुडसुरे, ग्रामसेवक विजय भोसले, मेवापूर येथे सरपंच कोमल तुळशीदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष राजकुमार कापडे, जनक्रांती डोंगरे विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्ष सौ.एस.बी.शिंदे, सचिव सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रुक्मिणी पांडुरंग सोमवंशी यांनी संत गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुत्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच सौ. मीना यादव केंद्रे, युवानेते यादवराव केंद्रे, ग्रामसेवक विजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. चिंचोलीला सन २०१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम पंचायतला ग्रामस्वच्छता अभियान मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments