तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे खुलताबाद (निरगुडी बु)
खुलताबाद तालुक्यातील ठाकरवाडी येथे 9 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक आदिवासी क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान आदिवासी ठाकर समाज हा संघर्ष मय जीवन जगतांना दिसून आला. ठाकरवाडीतील सुनिता कोंडीराम मधे आरती खंडू मधे आरती तुकाराम मेंगाळ वंदना लक्ष्मण गांगड बुधाबाई साहेबराव मेंगाळ या चिमुकलींच्या हस्ते आदिवासी राया ठाकर राघोजी भांगरे बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर विर एकलव्य छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतीकारकांची आदिवासी ठाकर समाजाच्या रुढीपरंपरानुसार आरती ओवाळण्यात आली यांच्या प्रतीमेला पुप्षहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमात वाडीतील लहान चिमुकल्यांनी आदिवासी पारंपारिक गाण्यांवर नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली.सायंकाळी शोभयात्रा काढून आदिवासी ठाकर व भिल्ल समाजाच्या रुढीपरपरांबद्दल जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात गावचे पोलीस पाटील गंगाराम मेंगाळ मा सभापती भिमराव खंडागळे मा सरपंच जालम गांगड उपसरपंच पांडूरंग मधे ग्रामपंचायत ऑपरेट दिपक चांडे ग्रा पं सदस्या श्रीमती जनाबाई मधे जि प शालेय व्यवस्थापन समितीचे अपाध्यक्षा सौ वंदना मेंगाळ बाळु मधे सोमिनाथ मेंगाळ सनिराम गावंडे बबन कातवरे तुकाराम बांगारे नवनाथ आगिवले तुकाराम मेंगाळ गणपत पारधे शिवराम मधे रामभाऊ पारधे
शाम मधे योगेश कातवारे
ज्ञानेश्वर मेंगाळ मेंगाळ रंगनाथ मेंगाळ कुणाल मेंगाळ कडूबा गांगड जयराम उघडे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments