.
प्रतिनिधी सनिराम गावंडे
नांदगाव तालुक्यातील जळगाव बु येथे दि.07 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी क्रांतीकारक राया ठाकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक श्री पांडू बाबा पारधी यांच्या हस्ते जळगाव बु ता नांदगाव जि नाशिक येथे उपशाखेचे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष स्थान भुषविले तसेच, सर्व कार्यकारिणीतील पदाधिकारी व गौताळा आदिवासी ठाकर समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांना आदिवासी ठाकर समाजाच्या महिलेने पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पांडू बाबा पारधी हे उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते दिप प्रज्वल करुन आदिवासी राया ठाकर, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, विर एकलव्य,डॉ बाबासाहेब आंबेडकर व काही आदिवासी क्रांतिकारकांच्या फोटोंना पुप्षहार घालून विनम्र अभिवादन करून उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पांडू बाबा पारधी यांनी आदिवासी क्रांतीकारक राया ठाकर,कॉ सक्रु मेंगाळ उघडे,राघोजी भांगरे,वीर एकलव्य बिरसा मुंडा,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मार्गदर्शन केलेव मधुकर गावंडे यांनी शाखेचे संस्थापक यांच्या खांद्याला खांदा लावून आदिवासी समाजाच्या समस्या, प्रश्न नक्कीच सोडवू असे आश्वासन देखील दिले.नंतर जळगाव बु शाखेच्या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देवून अभिनंदन केले जळगाव बु शाखेचे अध्यक्ष मधुकर गावंडे,उपाध्यक्ष सोमनाथ मेंगाळ,तालुका अध्यक्ष मधुकर मेंगाळ,उपतालुकाध्यक्ष सुनिल गावंडे, तालुका सचिव रविंद्र फोडसे,संघटक मधुकर मेंगाळ व सर्व कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच गौताळा आदिवासी ठाकर समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक पांडू कडाळे,व कार्यकारणी तील खेमा मधे,गंगाराम अगिवाले सुधाकर मेंगाळ,रोहीत मेंगाळ,भावडू मेंगाळ,भाऊसाहेब आगिवले,सनिराम गावंडे,आनंदा मेंगाळ मा हवालदार,पुंजाराम पथे,पांडूरंग गावंडे,काळू गि-हे,गंगाराम गावंडे,राहूल सांगळे सरुबाई मेंगाळ,रख्मा मेंगाळ,ताईबाई गावंडे, आदी ग्रामस्थ व हजारोंच्या संख्येने आदिवासी ठाकर बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments