Type Here to Get Search Results !

गावात घुसले पुराचे पाणी

 



गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-

डोणगाव :- डोणगाव येथे दि. १७ आँगसटला सकाळी ४ वाजतापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील काच नदीला पूर आला सदर पुलाचे पाणी नदीकाठी असलेल्या अंधारवाडी परीसरात घुसले तर पोलीस स्टेशन समोरील तलाव तुडुंब भरल्याने तलावाकाठी राहणार्‍या लोकांच्या घरात पाणी घुसले असून परीसरातील नदी नाले तुडुंब भरले असून सकाळ पासून सदर राज्य महामार्गोवर असणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

 डोणगाव येथे जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत असून विदयूत पुरवठा खंडीत झाला आहे. डोणगाव येथील संपुर्ण शेतात पाणीच पाणी दिसून येत असल्याने यावर्षी बळीराजा हतबल झाला असून सदर पुरामुळे झालेले नुकसानाचे त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कॉंग्रेस चे विनायक टाले यांनी केली असून तलावाकाठी व नदी काठी राहणार्‍या घरांचे पाहणी करून नुकसान ग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी येथील युवा नेते ठेकेदार शेख रफीक शेख हाफीस यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments