Type Here to Get Search Results !

कशी दारूची ही लत तुज लागली



नातेवाईका झाली चर्चा दुरावलेत मित्र सारे 

आसवात या भिजली पत्नी ऐक माझ्या सख्या रे 

 मित्रा,दारूने ही वाट तुझी लावली 

 कशी दारूची ही लत तुझ लागली...!

 शिकलो शाळेत संस्काराच्या शिस्तीत

 खेळलो रे छान मौज अन मस्तीत

 सांग अवदसा अंगी का घुसली 

 कशी दारूची ही लत तुज लागली....!

 गाळूनीया घाम करी तू जिवाचे रान 

 दारूच्या या घोटापायी हरवले रे भान 

 कुसंगतीत आन कुणा वाहिली 

 कशी दारूची ही लत तुज लागली....!

 सोन्याचा संसार गुणाचे लेकरूबाळ 

 जन्मभराच्या सखीचा नको करू रे छळ 

 संसाराची माया तुझी का आटली 

 कशी दारूची ही लत तुज लागली....!

 नको घालवू रे वाया मेहनतीची ही कमाई 

 जीवाचीही होई हानी दारूच्या या मोहापायी 

 जित्यापणी सजा तू का भोगली 

 कशी दारूची ही लत तुज लागली....!

 विनू जोडतो हात हा जन्म पुन्हा नाही 

 लाभले भाग्य तुज जन्मदात्यांची पुण्याई 

 दारूच्या या लतीपायी स्वप्न सारी भंगली 

 कशी दारूची ही लत तुज लागली....!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments