कोपरगाव प्रतिनिधी शिवाजी पाटील
तीर्थक्षेत्र कोकमठाण साधु संतांच्या पावन नगरीत कारवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह वर्ष 42 वे परंपरा जपणारे नागरीक शुकलेश्वर महाराज ची, लोंढे महाराजाची प्रेरणा व आशीर्वाद रुपाने हा सप्ताह सुरू झालेला आहे या सप्ताहात साईसच्चरित पारायण सोहळा व्यासपीठ चालक अरुण महाराज रोहम यांच्या सुश्राव्य वाणीतुन भावीक भक्त उपस्थित मध्ये हा सप्ताह आनंदाने पार पडत आहे या प्रसंगी दररोज किर्तन प्रवचन हरीपाठ, नंतर नागरीक उपस्थित दररोज जेवण पंगत असा आगळावेगळा स्वरूपात सप्ताह कमिटी हनुमान मंदीर समोर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे
त्यात अन्नदान करणारे नागरीक वाड्या वस्त्या वरून आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी हि कमिटी सज्ज आहे पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी विनंती सप्ताह कमिटी हनुमान मंदीर कारवाडी कोकमठाण यांनी केली आहे

Post a Comment
0 Comments