रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
तांदलवाडी परिसरातील शेतकरी मागील ८ दिवस झाले ई-पिक पाहणी ॲप चालत नसल्याने त्रस्त झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाने खरीप व रब्बीच्या हंगामाचे पीक पेरे लावण्यासाठी शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी हे अॅप गाव नमुना १२मध्ये स्वतःहुन आपल्या भ्रमणध्वनीद्वारे लावण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. या अॅप वरून शेतकरी आपापल्या शेतातील हंगामानुसार पेरे लावतात आणि गाव तलाठी हे पेरे ग्राह्य धरतात. परंतु, या वर्षी रब्बी हंगामासाठी १ ऑगस्ट पासून तर १४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली गेली आहे. पण हे नवीन सुधारित अॅप मागील ८ दिवसांपासून चालत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत. शेतात तासन्तास थांबावे लागत असून ही ॲप चालत नसल्याने पिक पेरे लावायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments