शिवपुरी येथील ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच एक महत्त्वाची ग्रामसभा पार पडली या सभेत गावाच्या विकासासाठी आणि समस्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
सभेतील प्रमुख मुद्देः
१)मागील सथा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी माहिती देणे- ग्रामस्तरीय समितीची स्थापना करणे, तसेच विश्ववार लहान गट स्थापन करणे,
१) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर पाकूले पूर्ण करणेबाबत.
४) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वार्षिक कृति आराखडा तयार करणे व वैयक्तिक व सार्वजनिक कामांची निवड करणे
५) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रधानी अंमलबजावणी करणे.
६) बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ ची जनजागृती करणे
७) ग्रामपंचायत करवसुली करणेबाबत
रस्ते दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्याचे निश्चित झाले.स्वच्छता मोहीम येत्या काही दिवसात हाती घेतली जाईल.पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली जाईल.ग्रामविकास आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी केली जाईल.एकूणच, ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची ठरली.ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती निवड करणे.पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे ठरले.उपस्थित मान्यवरःया ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments