प्रतिनिधी अरविंद कोठारी
मुंबईतील जुन्या आणि मानाच्या गोविंद पथकांपैकी एक असणाऱ्या जय जवान गोविंदा पथक आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्यात नुकताच रंगलेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. जय जवान गोविंदा पथकाने काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा त्यांना दहीहंडी रचून सलामी दिली होती. यामुळे शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या प्रो-गोविंदा स्पर्धेतून जय जवानला वगळण्यात आले होते.आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोपही जय जवान पथकाने केला होता.
या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या व्यासपीठावरुन या टीकेचा वचपा काढला. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर दहा थर रचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान मंडळाला टोमणा मारला.

Post a Comment
0 Comments