Type Here to Get Search Results !

प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर चक्क घाणीचे साम्राज्य.



गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-

डोणगाव. डोणगाव येथे सध्या ठिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे एवढेच नव्हे तर जेथे आरोग्यावर उपचार केले जातात त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरच घाणीचे साम्राज्य पसरल्याने डोणगाववासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डोणगाव येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो व हा बाजार चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर भरतो त्यामुळे या ठिकाणी चक्क घाण पडलेली असताना स्थानिक ग्रामपंचायत ही बघ्यांची भुमिका घेत आहे त्यामुळे राज्य महामार्गोवर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्यावर हा बाजार भरतो व याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे व सदर घाणीचा वास सुटला आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायत ने स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments