*भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव*
पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हे निसर्गसंपन्न ठिकाण आहे.भोर मधील आसपासच्या परिसरात उंच डोंगर, ट्रेकिंग साठी गडकिल्ले, पक्षांचा किलबिलाट, खळखळ नारे धबधबे, व नीरा देवघर तसेच भाटघर धरणांमध्ये साठलेले अथांग पाणी जनु काही स्वर्गाचा अनुभव घेता येतो.
*भोर मधील काही प्रमुख निसर्गरम्य स्थळे*
• इंगवली येथील नेकलेस पॉईंट
• भाटघर धरण
• भोर येथील राजवाडा, शनि घाट,व भोरेश्वर मंदिर, तसेच वाघजाई मंदिर
• येथील कान्होजी जेधे यांचा वाडा
• आंबावडे येथील झुलता पूल व नागनाथाचे मंदिर
• बाजारवाडी मानकरवाडी येथील रोहीडा ( विचित्रगड ).
• भोर परिसरात आदी गडकिल्ले - रायरेश्वर,केंजळगड,कावळागड
अशा प्रकारे बघण्यासारखे अनेक पर्यटक स्थळे भोर तालुक्यात आहेत. या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसुन येत आहे.

Post a Comment
0 Comments