प्रतिनिधी – अहिल्यानगर ,
श्रीरामपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरी, दस्तनोंदणीतील अनियमितता आणि बोगस नोंदींचा आरोप करत राजेश बोरुडे, शिवाजी दांडगे व सुधिर तुपे यांनी नोंदणी महानिरीक्षक, पुणे तसेच सह जिल्हा निबंधक, अहिल्यानगर यांच्याकडे संयुक्त तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक कागदपत्रे असतानाही दस्त हेतुपुरस्सर नाकारले जातात व दलालांच्या माध्यमातून लाच घेऊन नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केली जाते. याशिवाय बोगस कागदपत्रांवर दस्तनोंदणी होत असून शासन महसूल बुडवला जात आहे, असे आरोप तक्रारीत आहेत. तक्रारदारांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची, गेल्या तीन वर्षातील नोंदींची तपासणी करण्याची आणि कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments