गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव :- डोणगाव हे नागपूर ते मुंबई राज्य महामार्गोवर असणारे गाव असून सध्या येथील राज्य महामार्गोवर बसस्थानक परीसरात वारंवार रस्त्यावर खड्डे पडत आहे सदर खड्डे बुजविले ही जात आहे पण रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या नसल्याने डोणगाव राज्य महामार्गोवर सदैव पाणी वाहून मोठे खड्डे पडत आहे
तर राज्य महामार्गोलगत असणारे हॉटेल चालक ही चक्क रस्त्यावर पाणी सोडत असल्याने रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असून यामुळे अपघात वाढत आहे. तर डोणगांव बसस्थानकपरीसरात अतिक्रमण काढून रस्त्यालगत दोन्ही बाजूने नाल्या करणे आवश्यक आहे नाहीतर वारंवार रस्त्यावर येणारे पाणी यामुळे रस्ता खड्डेमय होत आहे याकडे राष्ट्रीय रस्ते वाहतूक विभाग व स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित नाल्या कराव्यात अशी मागणी वाहनधारकातून होत आहे

Post a Comment
0 Comments