राहुल चव्हाण @बारामती
बारामती:- दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी डोर्लेवाडीत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत गरजु विद्यार्थ्यांना तब्बल 1,000 व जिल्हा परिषद शाळेत 500 वह्या, पुस्तके व प्रत्येकी शाळेत 100 स्कूल बॅग वाटण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी बोलत असताना श्री. मार्तंड देवस्थान ट्रस्ट, जेजुरीचे मुख्य विश्वस्त अभिजित अरविंदराव नंदाताई देवकाते पाटील यांनी जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल याकडे सध्या देवस्थान पाहत आहे. येणाऱ्या काळात श्री. मार्तंड देवस्थान ट्रस्ट गरजु विद्यार्थ्यांची शालेय फी सुद्धा पूर्तता करण्याचे काम आम्ही देवस्थान ट्रस्टचा माध्यमातुन करू अशी ग्वाही दिली.
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी सरपंच सौ. सुप्रिया नाळे, उपसरपंच सुनील म्हेत्रे, भगवान क्षीरसागर, बापुराव गवळी, अशोकराव घोरपडे, विठ्ठल नाळे, माऊली मदने, उत्तम घनवट, धनंजय कालगावकर, निवृत्ती नेवसे,कांतिलाल काळकुटे, यशोदीप नाळे, हरीभाऊ आटोळे, ॲड. सचिन दळवी,गजानन नाळे, अजित वामन,राजीव नाळे, संदीप नाळे, प्रमोद देवकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष इंगळे, सर्व सदस्य, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी प्रास्ताविक मनोज काळोखे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शिंगाडे मॅडम व श्री. दोडमिसे सर यांनी केले

Post a Comment
0 Comments