खुलताबाद तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे
खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायत निरगुडी बुद्रुक मधील 90 ते 95 टक्के आदिवासी गाव असलेल्या ठाकरवाडी भिलवाडीतील चक्क दोनशेच्या वर मुलांची जन्म नोंदच ग्रामपंचायत मध्ये आढळून आली नाही शासनाच्या नवीन नियमानुसार जन्म दाखला आणि शाळेतील मुले हजेरीपटावरील ऑनलाईन करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केल्याने ठाकरवाडीतील पालक ग्रामपंचायत मध्ये जाऊन जन्म दाखला घेण्यासाठी विचारणा केली असता ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक,सरपंच यांनी पालकांना सांगितले की, तुमच्या मुलांची ग्रामपंचायत मध्ये जन्म नोंद नाही व नोंद नसल्यामुळे जन्म दाखला मिळणार नाही असे सांगण्यात आले तेव्हा या आदिवासी ठाकर,भिल्ल समाजाच्या व्यक्तींची/पालकांनी संताप व्यक्त केला या भोळ्या भाबड्या आदिवासी ठाकर,भिल्ल समाजाने अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडे जन्मदिनांक नोंदणीसाठी दिली होती ग्रामपंचायत मधील कर्मचा-यांनी नोंदणी करून घेतली नाही जन्म नोंदणी झाली आहे अशा या कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर पालक/गावकरी राहिले परंतू जन्म नोंदणी केलीच नाही त्यामुळे ठाकर वाडी,भिलवाडीतील मुलांच्या जन्म दाखल्यासाठी पालकांची धावपळ सुरू झाली आहे.

Post a Comment
0 Comments