रावेर प्रतिनिधी - भिमराव कोचुरे
लातुर जिल्यातील निलंगा तालुक्यातील दादगी या गावातील शिवाजी वाल्मीक मेळके (कोळी) वय 32 वर्ष या आदिवाशी कोळी समाजाच्या तरुणाने आपल्या मुलांचे शालेय शिष्यवृत्ती कामी महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळणे मिळणे कामी उपविभागीय कार्यालय निलंगा येथे अर्ज दाखल केला होता .परंतु एक वर्षचा कालावधी होऊनही जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव त्यांना येत होता.
आपले मुले शिष्यवृत्ती पासून वंचित राहतील अशी भिती त्यांना नेहमी सतावत होती .याच तनावाखाली येऊन त्यांनी दि .13-9-2025 रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारासविजेच्या तारांना धरून आपले जिवन यात्रा संपवली . त्यामुळे त्यांचे दोन्ही मुले आज अनाथ झाली आहे. म्हणुन या घटनेला दोषी असलेले निलंगा येथिल उपविभागिय अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून ,मयताच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी अशा मागणीचे निवेदनफैजपुर येथिल उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच व भविष्यात टोकरे कोळी , महादेव कोळी , मल्हार कोळी , यांना जातीचे प्रमाणपत्र सुलभ रितीने मिळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच भारतीय संविधानाच्या तरतुदी नुसारअनुसुचित जमातीत टोकरे कोळी , 28 ढोर कोळी , 28 महादेव कोळी 29 मल्हार कोळी , 30 असे अधिकार दिले असून त्याचे उल्लघन केले जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला जात आहे.या निवेदनावर प्रभाकर अप्पा सोनवणे (वढोदा ) जितेंद्र सपकाळे सर (भुसावल ) खेमचंद कोळी (पाडळसे) नितीन कोळी (अंजाळे) कैलास सोनवणे (बामणोद ) जगदिश सपकाळे , गणेश कोळी , नितिन पंडीत , गणेश पुंडलीक , योगराज सोनवणे , भिका सपकाळे , विकास सपकाळे , समाधन कोळी ,यांच्या सह्या आहेत

Post a Comment
0 Comments