प्रतिनिधि अरविंद कोठारी
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आझाद मैदानातील उपोषणाला मुंबई पोलीस पुढील काही दिवस परवानगी देणार आहे.मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देणार असले तरीत्यांच्यासमोर काही अटीशर्थी ठेवणारआहेत. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवायडोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.आझाद मैदानावर उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमलेले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परवानगीचा कालावधी मर्यादित रोज परवानगी साठी मनोज जरांगेना अर्ज करावा लागणार आहे. रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतची परवानगी दिली जाणार आहे.

Post a Comment
0 Comments