Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख

 


गणेश गावडे - पाटस प्रतिनिधी 

बातमी - पुणे जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत पाच एचपी पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी ऑपरेटेड पंप, ताडपत्री (सहा x सहा मीटर ,370 जी.एस.एम) तीन इंची पीव्हीसी पाईप (चार केजी प्रेशर) याची जाहिरात कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती दौंड यांच्याकडून आलेली असून शेतकऱ्यांनी सदरचे अर्ज जिल्हा परिषद पुणे यांनी तयार केलेल्या वेबसाईटवर (https://zppunecessyojana.com) ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत सदर अर्ज भरताना काही कागदपत्रांची गरज पडणार आहे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, अर्जदाराचा फोटो व जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीमधील असल्यास जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्ज भरताना अपलोड करायची आहेत तसेच प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 ही आहे व काही अडचण असल्यास पंचायत समिती दौंड कृषी विभाग येथे संपर्क करावा करावा.

Post a Comment

0 Comments