तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : वरणगांव परिसरातील गणेश विसर्जना निमित्त तापी नदीवरील हतनूर धरण व पुलाजवळ वरणगांव सिव्हील सोसायटी व चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगांव या पर्यावरण स्न्हेही संस्थांमार्फत तब्बल २० टन निर्माल्य संकलित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही तापी नदीतील पाणी प्रदूषित होऊ नये याकरिता वरणगांव सिव्हील सोसायटी व चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगांव यांनी निर्माल्य संकलनाची जय्यत तयारी केलेली दिसून आली. श्री गणेश मूर्ती विसर्जन स्थळी आलेल्या भक्तांना सहज निर्माल्य जमा करता यावे या करिता हतनूर पुलाच्या दुतर्फा निर्माल्य संकलनासाठी चार ट्रक्टर ट्रॉली उभ्या करण्यात आल्या होत्या. वरणगांव सिव्हील सोसायटी व चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगांवचे निर्माल्य संकलनकर्ते, स्वयंसेवक पुलाच्या दुतर्फा उभे राहून कोरडे व ओले निर्माल्य गोळा करून वेळीच विलगीकरण करताना आढळले. गेल्या काही वर्षांपासून हा पर्यावरण पूरक उपक्रम संस्था सातत्याने राबवीत असल्याने परिसरातील नागरिक, गणेशभक्त व विसर्जनकर्त्यांचे चांगले सहकार्य निर्माल्य संकलन कर्त्यांना लाभले. गणेश भक्तांमध्ये यामुळे पर्यावरनपूरक जागरूकता वाढत असून स्वत:हून निर्माल्य जमा केल्याशिवाय गणेश भक्त विसर्जनासाठी पुढे जात नव्हते. सकाळी ९ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत निर्माल्य संकलनाचे कार्य चालू होते. निर्माल्य संकलक यांनी हातात वेगवेगळे पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती केली.
यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांशी या विषयावर वार्तालाप करून प्लास्टिक किंवा अविघटीत निर्माल्य यांचा वापर कमी करून पर्यावरण पूरक साहित्य कसे वापर करता येईल यावर प्रबोधन केले. वरणगांव सिव्हील सोसायटीने प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीपासून गणेश मूर्तीचा वापर वाढावा यासाठी कार्यशाळा देखील परिसरात आयोजित केली होती. २० टन निर्माल्य नदीत टाकण्यापासून, नदी प्रदूषित होण्यापासून आम्ही वाचवू शकलो, अशा भावना वरणगांव सिव्हील सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राहुल भोईटे (भोईटे हॉस्पिटल वरणगांव) व चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगांवचे अध्यक्ष अनिल महाजन ( पक्षी अभ्यासक ) यांनी व्यक्त केल्या. यावेळी संकलित निर्माल्यावर वरणगांव नगरपालिका कचरा विलगीकरण व सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया करणार करणार आहे. या उपक्रमासाठी नगर परिषद वरणगांव व हतनूर गावचे सरपंच, सावदा येथील पोलीस पाटील वासुदेव इंगळे तसेच वरणगांव सिव्हील सोसायटी व चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगांव यांचे सदस्य उदय चौधरी, रामचंद्र पाटील, मनोज बडगुजर, डॉ.अनुजा भोईटे, आर एन पाटील, श्रद्धाताई चौधरी, विलास महाजन, गोपाळ गावंडे, सचिन बेलोकार, सोनाली पाटील, समीर नेवे, गोपाळकुमार कळसकर, राहुल सोनवणे, योगेश वानखेडे, राजू गायकवाड,सदानंद जोशी, श्रीकांत माळी, डॉ.अनिल शिंदे, अजय पाटील, दीपक सोनार, कमलेश येवले, अक्षय भावसार, हेमंत पाटील, दीपक शिंपी, संजय पाटील, विनायक सपकाळे, सत्यपालसिंग राजपूत, स्वप्नील कुलकर्णी, सुरेश ठाकूर, चव्हाण साहेब आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments