Type Here to Get Search Results !

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मदत करा



    शिवाजी कवडे 

शिर्डी प्रतिनिधी/ शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाने तांत्रिक नियमाच्या अडचणी दूर करून तात्काळ हेक्‍टरी दिड लाखाची मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी केली आहे 

कोपरगाव तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे त्यास कोकमठाण कारवाडी हा परीसर अपवाद नाही अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे सोयाबीन मका घास भाजीपाला ऊस अन्य पिकांच्या मधुन पाणी वाहत आहे शेतीला चक्क नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे कांद्याच्या चाळीत पाणी घुसल्याने सर्वात जास्त नुकसान झाले आहे 

रस्ते पुर्णपणे खराब असल्याने दळणवळण व्यवस्था खंडीत झाले आहे शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी 

शिवाजी कवडे यांनी केली आहे


Post a Comment

0 Comments