Type Here to Get Search Results !

कन्नड तालुक्यात सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव एल्गार मोर्चा



खुलताबाद सनिराम गावंडे 

कन्नड तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी हजारोच्या संख्येने सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव एल्गार मोर्चा काढण्यात आला त्यांच्या प्रमुख मागण्या १)अनुसूचित जमातीच्या यादीत बंजारा धनगर व कोणत्याही समाजाचा समावेश करू नये २)आमदार व खासदार  बंजारा धनगर समाजाला पाठिंबा देतात त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी ३) ST-A,ST-B अशा प्रकारे (भाग) वर्गीकरण करू नये या मोर्चाला गिरणी मैदानापासून सुरुवात केली त्या मोर्चात आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आदिवासी एकजुटीचा विजय असो या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वरती पाय, एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणांनी सारी कन्नड नगरी दुमदुमली होती पांडू कडाळे यांनी राया ठाकर विर एकलव्य राघोजी भांगरे बिरसा मुंडा महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर तंट्या भिल भागोजी नाईक नाग्या कातकरी या क्रांतिवीरांना आणि महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून पुढील वक्तव्य सुरू केले आदिवासींचा हक्क वाचवण्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे शासनाने सुद्धा सरकारला कळवावे की आदिवासी काही कमी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिले आहे त्यात आम्ही समाधानी आहोत आम्ही कुणाचे आरक्षण मागत नाही आणि आमचे आरक्षण कोणत्याही समाजाने मागू नये. आदिवासी समाज कोणाच्या थाटात खात नाही पण आदिवासींच्या थाटातलं दुस-यांनी खाऊ नये SC,ST समाजाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेलं आहे हे आरक्षण कोणी कमी करू शकत नाही कोणी घुसखोरी करू शकत नाही 

तरी आपण झोपायचं नाही लढायचं सरकारला दाखवून देऊ की आदिवासी जमाती कोण आहे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मिटलं नाही तर मुंबईला जाऊ पण बंजारा धनगर व इतर जातींना आरक्षण मिळवून देणार नाही एस टी प्रवर्गात घुसू देणार नाही अशी ठाम भूमिका पांडु कडाळे यांनी मांडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर राघोजी भांगरे बिरसा मुंडा महात्मा फुले विर एकलव्य या क्रांतिवीरांना महापुरुषांचे विचारांना अभिवादन करून आदिवासी समाजाला एकजूट व्हावे लागेल आणि लढा द्यावा लागेल आदिवासी विकास मंत्री व देशाची राष्ट्रपतींनी आदिवासींना ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना च्या शुभेच्छा दिल्या का? असा सवाल उपस्थित केला आम्ही कुणाचं आरक्षण मागत नाही आणि आमचं आरक्षण कोणत्याही समाजाने मागू नये बंजारा धनगर समाजाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा जाहीर निषेध केला असंवैधानिक मार्गाने एखाद्या राज्य सरकारला पत्र देऊन समाजा- समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी ही लोकं कारणीभूत ठरतात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे व संजना ताई जाधव कन्नड मतदारसंघातील आमदार यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी चांगलेच ठणकावून सांगितले धनगर बंजारा समाजाला सत्ताधारांनी काम दिलं आहे समाजा- समाजात भांडणे लावण्याचा भाजप सरकारचा अजेंडा आहे असे वक्तव्य  सुद्धा केले याप्रसंगी बोलताना म्हणाले की 1950 साली राष्ट्रपतींनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने संविधानाने दिलेल्या अधिकारात अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण दिलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम 342 नुसार महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रा संबंधीत  दिनांक 6 सप्टेंबर 1950 रोजीच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या आदेशात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत संस्थेने वेळोवेळी सुधारणा केलेल्या अनुसूचित जमातीच्या याद्या सूचीबद्ध केलेल्या आहेत त्यामध्ये बंजारा अशी नोंद नाहीत त्यात आम्ही कुणालाही घुसखोरी करू देणार नाही अशा शब्दात कडाडून विरोध केला 

आदिवासी आरक्षण बचाव एल्गार मोर्चाचे संपूर्ण नियोजन करून कोणत्याही व्यक्तीला गालबोट न लागता हा मोर्चा सुधाकर मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडला हिवरे बर्डे विलास मोरे गोरख नाईक रमेश माळी सोनू पवार सुधाकर मेंगाळ पांडू कडाळे गंगाराम आगिवले तुकाराम मधे सखाराम भूतांबरे शिवराम मेंगाळ विठ्ठल मेंगाळ कचरू सावंत राजू आगिवले दुबळीराम पथवे रघुनाथ मेंगाळ रघुनाथ कातवरे यशोदा कातवरे लता भूतांबरे बुधाबाई पोकळे बबन कातवारे बाळू मधे गणपत पारधे  सोमीनाथ मेंगाळ रतन मधे रावजी पथवे अंबादास मोरे राजीव निकम वंदना मेंगाळ संगीता पथवे अल्का मेंगाळ भावडू मेंगाळ सरिचंद दोरे सुखदेव कातवारे अशोक माळे विशाल पवार सुनिल माळे गोपीनाथ मधे रवींद्र फोडसे साईनाथ मेंगाळ जगन्नाथ आगिवले वाळूबा मेंगाळ बाळू पथवे सुनील मेंगाळ विनायक मधे सुभाष मधे कैलास मधे महादू मेंगाळ यांच्यासह आदिवासी ठाकर भिल्ल समाजातील महिला पुरुषांची हजारोच्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या आणि भावना तात्काळ सरकारपर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिले यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता

Post a Comment

0 Comments