गणेश गावडे - पाटस प्रतिनिधी
दौंड तालुक्यात तब्बल 40 वर्षानंतर पुन्हा पंतप्रधानांची सभा येत्या ३० सप्टेंबरला होत असून याच्या अगोदर सन १९८५ मध्ये तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आले होते आणि आता त्यानंतर तब्बल 40 वर्षांनी म्हणजे 2025 मध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. येत्या 30 सप्टेंबरला दौंड तालुक्यातील पाटस मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितीत राहणार आहेत. यासाठी प्रशासनाने कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे.
या पाहणीत तालुक्याचे आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकडवार, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी पोलीस दौंड बापूराव दडस, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. या सभेमुळे दौंड तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments