रावेर प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे
तालुक्यातील उदळी शेतशिवारामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेत पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास ७० ते ८० हेक्टर शिवारात पाणी साचले असून प्रशासनाकडून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसामुळे उधळी परिसरातील शिवारात नैसर्गिक नाले शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केल्याने हे पाणी थांबले असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या आठवडाभरापासून शेतात पाणी थांबल्याने शेतातील पिकांच्या मुळा कुजत आहेत. केळी मका कपाशी या पिकांच्या मुळा कुजल्याने उभे पीक जमीनदोस्त होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे. कपाशी पिकाच्या बोंड कुजत असल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यादरम्यान नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळेच शेत शिवारात पाणी तुंबल्याने हे नैसर्गिक नालेवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अशी मागण
यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. पिकांवर मोठा खर्च शिवारात केळी, कपाशी, मका, उडीद, मूग अशी खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सध्या पिकांवर मोठा खर्च होत असतो वेळेवर मजुरी खते मनुष्यबळाचा खर्च करून शेतकरी पिके वाढवत असतो. परंतु नैसर्गिक आपत्ती बरोबरच मानवनिर्मिती आपत्तीने शेतकरी मेटाकुटीस आला असून त्वरित शेतशिवारातील पाणी बाहेर निघेल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments