Type Here to Get Search Results !

शेती साहित्यासह मोटर सायकल चोरांची टोळी निंभोरा पोलिसांनी केली गजाआड.



12 लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत 


रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे


गेल्या काही दिवसा पासून निभोरा पोलीस स्टेशन तसेच सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या परिसरातील शेतकरी यांचे शेती उपयोगाचे साहीत्य तसेच तोलकाटया वरील बैटरी-इन्व्हेंटर साहीत्य व मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटना घडल्याने निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. हरीदास बोचरे यांना वरिष्ठांनच्या मार्गदर्शनाने पोलिसांनी गेल्या १५ दिवसा पासुन साकळी पध्दतीने नाकाबंदी, रात्रगस्त करुन तांत्रीक व अधुनिक पध्दतीने तपास करुन व मिळालेल्या गुप्त माहिती वरुन दि. १९/०९/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास संशयीत इसम विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगांव याचा शोध घेतला असता त्याला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने पळुन गेला त्याचे राहते घर झोपडी मध्ये त्याचे सोबत राहत असलेली महिला योगीता सुनिल कोळी हि मिळून आली सदर झोपडी तपासली असता त्या मध्ये मी.सा. लहान सोलर पलेट, इतर साहीत्य मिळून आल्याने त्याबाबत कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता सदरचे साहित्य हे विलास ऊर्फ काल्या वाघोदे हा त्याचे शिरसाळा येथील साथीदार तसेच वडगाव येथील जमील तडवी यांचे मदतीने निंभोरा येथे राहणार स्वप्नील चौधरी यास विकत असल्याची कबुली दिल्याने सपोनि हरीदास बोचरे यांनी निंभोरा पोलीसांच्या मदतीने चोरीचा माल घेणारा मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेवून त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचे घर व गोडावून मधून चोरी केलेल्या बॉटरी इतर मशिन व शेती साहीत्य तसेच इतर साहित्य वगैरे मिळून आले आहे.

सदर प्रकरणात चोरी करणारा मुख्य आरोपी १) विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे रा. वडगाव नदीकाठी (फरार),त्याचे साथीदार २) सौ. योगीता सुनिल कोळी रा. तफ्त कठोरा ह.मु. वडगांव नदीकाठी, ३) गोपाळ संजय मोलनकर, ४) आकाश मधुकर चोटकर, ५) अर्जुन रतनसिंग सोळंकी सर्व रा. शिरसाळा ता. बोदवड, हे आहेत. सदर आरोपी यांनी चोरी केलेला माल ताब्यात ठेवून विल्हेवाट लावणारा आरोपी ६) जमील अब्दुल तडवी वय ४० रा. वडगांव तसेच सर्व चोरीचा माल घेणारा आरोपी मुख्य आरोपी ७) स्वप्नील वासुदेव चौधरी वय ३५ रा. निभोरा बु हा ता. रावेर हा असुन तसेच ८) राकेश सुभान तडवी रा. सावदा, ९) ललित सुनील पाटील निंभोरा रा. रावेर, १०) राहुल उर्फ मयूर अनिल पाटील रा. वडगाव हे असून सदर आरोपी यांचे कडुन शेती साहित्य H.T.P. पंप मटेरीयल सोडण्याचे मशिन ५, मोठ्या साईच्या बॅट-या ११. इन्वार्टर मशिन-५, मोटार सायकल-४, पावर ट्रोलर लहान ट्रैक्टर-२ नैनो कार-१ तसेच इतर साहित्य असा एकूण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन निंभोरा पोलीस स्टेशन कडील ०५ गुन्हे, यावल पो.स्टे. चे ०२ गुन्हे, रावेर पो.स्टे.चे ०१ गुन्हे, मुक्ताईनगर पो.स्टे. चे ०१ गुहे, सावदा पो.स्टे.चा ०१ गुन्हा, असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणून निंभोरा पोलीसांनी आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत करुन धडाकेबाज कारवाई केली आहे

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डी. श्री. महेश्वर रेड्डी सो (भापोसे), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपुर विभाग श्री. अनिल बडगुजर सो, यांचे मार्गदर्शनाखाली निभीरा पोलोस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि हरिदास शिवराम बोचरे यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि दिपाली पाटील, मपोउनि ममता तडवी, पोहेको सुरेश अढायगे, पोहेको बिजू जावरे, पोहेकों रिजवान पिंजारी, पोना अविनाश पाटोल, पोना सुरेश पवार, पोकॉ किरण जाधव, पोका रशिद तडवी, पोकॉ सरफराज तडवी, पोकॉ रफिक पटेल, पोकॉ अमोल वाघ, पोकॉ प्रभाकर हसाळ, पोकॉ प्रशांत चौधरी, पोकॉ महेंद्र महाजन, पोकॉ परेश सोनवणे, पोकॉ भुषण सपकाळे, पोकॉ सुभाष शिंदे, तसेच चालक पोहेकॉ योगेश चौधरी व पोकॉ राहुल केदारे यांचे सह महिला पोलीस अंमलदार यांनी केली आहे. त्याच प्रमाणे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार... यांनी योग्यती मदत केली आहे.

सदर गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ठरित्या कामगीरी केल्याने पोलीस दलाचे रावेर, यावल, मुक्ताईनगर येथील सर्व शेतकरी व परिसरातील नागरीकांनी कौतुक करुन जनमानसात सुरक्षेची भावाना निर्माण झालेली आहे.

 3 Attachments

  •  Scanned by Gmail


Post a Comment

0 Comments