Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत बिरोबाची वाडी येथे विशेष ग्रामसभेत राडा

 


 गणेश गावडे- पाटस प्रतिनिधी

 आज दिनांक १०/०९/२०२५ रोजी ग्रामपंचायत बिरोबाची वाडी येथे विशेष ग्रामसभा पार पडली त्यामध्ये सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता या मुद्द्यावर वाचन करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थ व ग्रामसेवक यांच्यामध्ये वादाचा प्रसंग निर्माण झाला याचे कारण असे की ग्रामपंचायत बिरोबाची वाडी येथे काम करत असणाऱ्या ग्रामसेवक सुरेखा संजय सोनवणे रजेवर असल्याकारणे त्यांच्या जागी तात्पुरते काम पाहण्यासाठी आलेले ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी कुठलाही प्रश्न विचारले ते मला काही माहीत नाही अशी टाळाटाळीची उत्तरे त्यांच्याकडून येत होती या वाचनादरम्यान असे काही धक्कादायक माहिती समोर आली की या ग्रामपंचायत मध्ये एक ते सात नमुने अद्यावत केलेले नाहीत संपूर्ण गावात फक्त एक घरकुल देण्यात आले आहे मनरेगा योजनेचे बाबत जन जागृती म्हणून कुठल्याही प्रकारची उपयोजना केलेली नाही किंवा गावात फलक लावलेले नाहीत दक्षता समिती स्थापन केलेली नाही सदर ग्रामपंचायत मध्ये सामाजिक अंकेक्षण करताना मस्टर उपलब्ध नाहीत ग्रामपंचायत मध्ये अजूनही रोजगार सेवकाची नियुक्ती केली नाही सदर ग्रामपंचायत मध्ये सामाजिक अंकेक्षण करताना ग्रामपंचायत मधील लोकांना कोणत्या योजनेची माहिती मिळाली नाही असे समोर आले त्या अनुषंगाने येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्याकडे ग्रामसेवक सुरेखा संजय सोनवणे यांच्या नावाने तक्रारी अर्ज केला आहे.

Post a Comment

0 Comments