भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव
दिनांक २५/०९/२०२५ रोजी राजगड सहकारी साखर कारखाना अनंत नगर निगडे,ता.भोर जि.पुणे येथे साखर कारखान्याची ३५ वी अधिमंडळाची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेला राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्व संचालक मंडळ यांचेसह शेतकरी सभासद व कर्मचारी वृंद आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
राजगड सहकारी कारखान्याला राज्य शासनाने कर्जहमी दिलेबद्दल विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब व सहकार्य करणारे सर्व अधिकारी यांचे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कामगार वर्ग, सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले.!

Post a Comment
0 Comments