भाऊबीजेच्या या सणाला
ओढ लागली माहेराची
रानातल्या गाईले जशी
गोठ्यातल्या वासराची
मोहमायेच्या या संसारात
गुंतलो ग साऱ्या जणी
भेटीसाठी आतुरले मायबाप
उभे दारी वाट पाहे घारीवानी
रमुनी जुन्या आठवणीत
माहेरातल्या या रस्ते अन गल्ल्या
नयनातुनी गाळीत अश्रू
जणू स्वागतास उभ्या ठाकल्या
बालपणातील खेळल्या खेळांच्या
उरी साठल्या आठवणी गोड
भाऊबीजेच्या या सणाला
लावे माहेराची ओढ
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments