मलकापूर (ता. कराड) : समाजातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची जाणीव ठेवून जननी चॅरिटेबल ट्रस्ट,मलकापूर या संस्थेने एक आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.या ट्रस्टच्या वतीने नांदलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,येथे विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर मशीन भेट देण्यात आली. त्याचे उद्घाटन मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाऊ यांच्या हस्ते व आदर्श सरपंच नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना मनोहर शिंदे म्हणाले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणार असून त्याचा थेट फायदा त्यांच्या आरोग्याला होणार आहे.समाजात आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यासाठी शाळा स्तरावर अशा उपक्रमांची गरज आहे.विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनाचे मूल्य याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले“ग्रामीण भागातील विद्यार्थी हेच भविष्यातील भारताचे खरे शिल्पकार आहेत.त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून जननी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप फुके यांनी हा उपक्रम हाती घेतला ते खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक आहेत असे म्हणणे हे योग्यच आहे.
यावेळी जननी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप फुके,आदर्श सरपंच नरेंद्र पाटील,सरपंच मानसिंगराव लावंड,सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वासराव निकम,यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास,प्रकाश ढेबे,मा.उपसरपंच धोंडीराम शिर्के,अशोक नलवडे,मनोज पाटील,वैभव शिर्के,अमोल थोरात, शिक्षक,शिक्षकी,विद्यार्थी, पालकवर्ग,ग्रामस्थ,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नारायण सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रविण लादे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments