नामदेव सरोदे
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने “राष्ट्रवादी परिवार संवाद व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती” हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुंदरबन मंगल कार्यालय, घोटावडे फाटा येथे पार पडला.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शनासाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर, तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, महिला तालुकाध्यक्षा सौ. नीताताई नागरे व युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुखदेव मांडेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुमारी पूनम नामदेव सरोदे हिचा आमदार शंकरभाऊ मांडेकर, माजी उपसरपंच संदिप भाऊ जाधव व सौ. जाधव ताई यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पूनम सरोदेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत राष्ट्रवादी परिवार एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments