गणेश गावडे - पाटस प्रतिनिधी
बिरोवाडीतील श्री बिरोबा देवाच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून यात्रे यात्रा कमिटीने अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन केले आहे बिरोबावाडीसह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात भक्तजन असलेल्या प्रसिद्ध व नवसाला पावणारा श्री बिरोबा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाची यात्रा सोमवार दि. ०६ व मंगळवार दि. ०७ या दोन दिवसात पार पडणार आहे दौंड - पाटस राज्य महामार्गावर असणाऱ्या या मंदिराचा परिसर स्वच्छ करून झाला असून मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सुशोभीकरण इत्यादी कामे पूर्ण झाली आहे सोमवारी पहाटेपासून श्री बिरोबाच्या जयजयकारानी संपूर्ण बिरोबावाडी परिसर दणाणून जाणार आहे
यावर्षी नव्या स्वरूपात विद्युत रोषणाई, आकर्षक मंडप, गाभारा सजावट, स्वागत कमान, फटाक्याच्या आतिश बाजी, पालखी छबिना मिरवणूक, लोकनाट्य तमाशा, दारुगोळा याची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे केल्याचे दिसून येत आहे तसेच यात्रेच्या तयारीसाठी जयदीप गावडे, धनेश येडे, अमोल येडे, विकास खारतोडे, प्रमोद गावडे, बाळासाहेब वायाळ, संकेत वायाळ, राहुल खारतोडे यांचा अनमोल असा वाटा दिसून आला व पंचक्रोशीतील भक्तांनी या यात्रेला उपस्थित राहावे असे आव्हान ग्रामस्थांच्या वतीने केले व जुनी यात्रा कमिटी यांना बाजूला करून भ्रष्टाचार मुक्त कमिटी तयार केली आहे असेही यांनी सांगितले

Post a Comment
0 Comments