फोटो ओळी : इस्लामपूर : ताब्यात घेतलेल्या गाईसह आरोपी समवेत पो.नि. सोमनाथ वाघ, उयसिंग पाटील, दिपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे व अन्य.
इस्लामपूर / प्रतिनिधी
बोरगाव ता. वाळवा येथील एक लाख रूपये किंमतीच्या दोन जर्सी गार्इंच्या चोरी प्रकरणातील चोरटयास इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. संजु सदाशिव हिरट्टी वय ३९ रा. कातराळ ता. कागवाड जि. बेळगांव असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत हर्षल हिंदुराव वाटेगांवकर रा. बोरगाव यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१३ ते दि.१४ आॅक्टोंबर रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान बोरगावातील हर्षल वाटेगांवकर यांचे जनावरांचे गोठ्यातुन एक लाख रुपये किमंतीच्या दोन काळे पांढ-या रंगाच्या जर्सी गाई कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. याबाबत इस्लामपुर पोलीस ठाणेत त्यांनी फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,स.पो.फौ. उदयसिंग पाटील, पो.हे.कॉ.कुबेर खोत तसेच डी बी पथकातील अंमलदार पो.कॉ.दिपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे असे इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की बोरगांव येथील जनावरांचे गोठ्यातुन गाई चोरी केलेला इसम हा आर.आय.टी कॉलेज रोडवर येणार आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव संजु सदाशिव हिरट्टी रा. कातराळ असे सांगीतले त्यावेळी त्यास अधिक विश्वसात घेवुन चौकशी केली असता गाई चोरी केलेची कबुली दिली. दरम्यान गाई कोठे आहेत याबाबत चौकशी केली असता इस्लामपुर ते जुनेखेड रोडवर एका ओळखीच्या माणसाकडे जनावरांचे गोठ्यात ठेवले असलेबाबत सांगीतले. त्या ठिकाणी जावुन जनावरांचे गोठयामध्ये बांधलेल्या गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या गुन्हयाचा पुढील तपास स.पो.फौ उदयसिंग पाटील हे करीत आहेत. या कारवाईमध्ये पो.हे.कॉ.कुबेर खोत, पो.कॉ. दिपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments