प्रतिनिधी-एस.ए.तुपे
(३० जुलै २०२५ अहिल्यानगर) राहाता तालुक्यातील महत्वाकांक्षी सावळीविहीर ते कोहकी रस्त्याच्या (इजिमा ९) मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे.
ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे सदस्य सुधीर तुपे, साईसकरण टाइम्सचे संपादक राजेश बोरुडे आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी दांडगे यांनी ही कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याचा आरोप आहे.
माहिती अधिकार (RTI) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांनुसार, रस्त्याच्या बाजूच्या गटारीसाठीचे खोदकाम अंदाजपत्रकात असूनही प्रत्यक्षात करण्यात आले नाही. तसेच, रस्त्याच्या पायासाठी आवश्यक असलेली कठीण मुरुमाची गुणवत्ता चाचणी पूर्णपणे टाळण्यात आली आहे.
या निकृष्ट कामामुळे काहीच महिन्यांत रस्ता उखडला आहे आणि कडा तुटल्या आहेत. प्रशासकीय नोंदींमध्ये रस्त्याचा दर्जा ‘ODR-1’, ‘ODR-9’ आणि ‘ग्रामिण मार्ग 26’ असा वेगवेगळा दाखवून निधीचा गैरवापर केल्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व विशेष आर्थिक लेखापरीक्षण (Special Audit) करण्याची मागणी केली आहे.
.jpeg)
Post a Comment
0 Comments