Type Here to Get Search Results !

जागतिक मानसिक आरोग्यदिनी समाजकार्य विभागात 'मानसिक आरोग्य' कार्यशाळेचे आयोजन.



तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर

 भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभागा अंतर्गत १० ऑक्टोबर  रोजी संचालक प्रा. डॉ. अजय पाटील  यांच्या मार्गदर्शनात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य याविषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रभारी प्राचार्य चेतन दिवाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. चेतन दिवाण यांनी मानसिक आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच मानसिक आरोग्य संदर्भात आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे, आपल्या सभोवताली असणाऱ्या नागरिकांना देखील यासंदर्भात जागरूक केले पाहिजे, समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून मानसिक आरोग्य याविषयी आपली जबाबदारी मोठी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला समाजकार्य विभागाचे प्रा. वर्षा पालखे, डॉ. कविता पाटील, डॉ. सुषमा तीनगोटे, प्रा. दिगंबर सावंत, विरेश पाटील, प्रा. विनेश पावरा, प्रा. योगेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. योगेश माळी यांनी केले तर आभार प्रा. वर्षा पालखे यांनी मानले. यावेळी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments