प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
जुना खेडलेझुंगे रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्ता कामास तातडीने मंजुरी मिळून काम सुरू व्हावे या मागणीसाठी रुई ता.निफाड येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. येत्या दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रूई येथील जिल्हा परीषद मार्ग क्रं.२६६, कि.मी. ११ ते १३ या जुना खेडला रस्त्याचे गत वीस वर्षापासून काम झालेले नाही. या रस्त्यालगत दाट लोकवस्ती आहे. हा रस्ता दळण वळण, शेतमाल वाहतुक व शालेय विद्यार्थ्यांना जाणे येणे साठी खूप महत्वाचा आहे. सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी व उपचारासाठी जाणे कामी फार उशीर होतो, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रस्त्याच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसिलदार, आमदार यांना पत्र व्यवहार तसेच लेखी निवेदन देऊनही अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित असुन न्याय मिळत नाही, म्हणून दि.१९ नोव्हेंबर पासून रूई धानोरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रामदास तासकर यांचे नेतृत्वाखाली अंकुश तासकर, विलास गायकवाड, बापू रोटे, निलेश रोटे, बापू तासकर, लीलाबाई बोरगुडे, संतोष तासकर, शोभा रोटे, संदीप रोटे, सुनील तासकर, बाळासाहेब गायकवाड, वैभव तासकर, लखन तासकर, महेश झुरळे, योगेश रोटे, बापू गायकवाड, राजू बोरगुडे, पिराजी तासकर, सुनिल शिंदे, केदारनाथ तासकर, माधव रोटे, पुंजाराम तासकर, दत्तात्रय कणसे, संजय तासकर, शरद तुपे,ओम बोरगुडे, किरण तासकर, भाऊसाहेब तास लकर, भागवत वाघ, चंद्रभान तुपे आदींसह आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, तरी शासनाने येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी, मा.पोलीस अधिक्षक, मा.तहसिलदार, मा.गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक लासलगाव यांना देण्यात आल्या आहेत
*या आहेत मुख्य मागण्या:-
जुना रुई ते खेडले झुंगे बोरमाथा रस्त्यास त्वरित मंजुरी मिळावी, या रस्त्याचे अतिक्रमण काढून सुरळीत करण्यात यावा, ठिकठिकाणी शेतकऱ्याच्या शेतातील पाणी निघण्यास सिमेंट पाईप टाकण्यात यावे, रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी साईड गटार (नाली) करण्यात याव्या.

Post a Comment
0 Comments