भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत कोषाध्यक्ष पदी चेतन शिंदे
Inbox
Jitendra Patil
Attachments
Wed, Nov 19, 2:20 PM (1 day ago)
to me
ईश्वरपूर / प्रतिनिधी
उरूण ईश्वरपूर येथील माजी नगरसेवक चेतन शिंदे यांची भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाडीक यांनी शिंदे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडीक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे हे विशेष उपस्थित होते. त्यांनीही चेतन शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पक्ष संघटन बळकटीसाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात राज्य परिषद सदस्य पै. जयकर कदम, युवा नेते सागर खोत, तालुका सरचिटणीस संग्राम गोइंगडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या ग्रामीण कार्यकारिणीमध्ये अनुभवी आणि सक्रिय नेतृत्व मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. चेतन शिंदे यांच्या निवडीमुळे उरूण ईश्वरपूर तसेच वाळवा-शिराळा परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुढील काळात संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments