*भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव*
दि.२६/११/२५ पुण्यात भोर येथे काल उशिरा अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17–18 वयोगटातील मयूर संपत कुंटे या निरपराध युवकाला भोर येथील पोलीस चौकीत PSI अनिल चव्हाण यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या मारहाणीमुळे मानसिक धक्का बसून, भीतीने ग्रस्त झालेल्या त्या मयूर ने गंभीर निराशेतून गळफास घेऊन स्वतःचा जीव संपविला, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
या घटनेची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण अंबेडकरी समाजात प्रचंड संताप उसळला. समाजातील नागरिक, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते न्यायाच्या मागणीसाठी रात्री 3 वाजेपर्यंत भोर पोलीस चौकीसमोर ठिय्या देऊन बसले होते. त्यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र, आंदोलनकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे, भोर पोलीस चौकीने या गंभीर प्रकरणाची गुन्हा नोंद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नागरिकांच्या रोषात अजूनही वाढ झाली असून, समाजाकडून ठोस, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.
स्थानिक समाजिक संघटना, अंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला असून, युवकास न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments