भोर प्रतिनिधी - नरेंद्र यादव
दि. २७/११/२५ भोर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक २ व ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या प्रचारात कार्यसम्राट आमदार श्री.शंकर मांडेकर, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री.रामचंद्र नाना आवारे तसेच प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार सौ.आशु सोमनाथ ढवळे व श्री.कुणाल कुमार धुमाळ आणि प्रभाग क्रमांक ४ श्री.अनुप चंद्रकांत धोत्रे व सौ.पुनम प्रविण साळुंके यांच्या सह नागरिकांना भेटून सविस्तर चर्चा केली.
प्रचार मोहिमेदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. शहरातील मूलभूत सुविधा – रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण – यासंबंधी भविष्यातील योजना नागरिकांना समजावून सांगण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले.
या प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. निर्मलाताई आवारे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करत भोर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांकडून पाठिंबा मागितला.

Post a Comment
0 Comments