इस्लामपूर / प्रतिनिधी
पेठ - गोळेवाडी ते सुरूल मुख्य रस्ता त्वरीत दुरूस्त करावा अशी मागणी भाजपा - रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांनी इस्लामपूर येथील सार्वजनीक बांधकाम विभागातील अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हंटले आहे, पेठ - गोळेवाडी ते सुरूल पर्यतच्या मुख्य रस्त्याचे काम नेहमीच अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून दरवेळी नुकतीच मलम पट्टी लावून रस्त्याची डागडुगी केली जाते. यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असुन या रस्त्यावरून जाणा-या प्रवशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून गोळेवाडी - नायकलवाडी - ओझर्डे - घबकवाडी - सुरुल या सह पंच क्रोशीतील नागरीक, शालेय विद्यार्थी यांची कायमची रेलचेल सुरू असते या रस्त्याकडे शासन कधीही गांभिर्याने पहात नाही. यामुळे प्रवाशी लोकांचे अत्यंत हाल होत आहेत.
यावेळी सांगली जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अमोल पाटील ,बजरंग कदम , राहूल पाटील , धनाजीराव इनामदार पाटील यांच्या सह या विभागातील कार्यकर्ते व प्रवाशी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments