मासरूळ जि बुलडाणा येथील कै.सुनील बाबुराव पायघन यांचे दि. 1/12/ 2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी दोन मुली व एक मुलगा असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे तरी, वर्गमित्र श्री विनोद जाधव यांच्या संकल्पनेतून सर्व मित्रांना यथाशक्ती प्रमाणे त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.सर्व वर्गमित्र-मैत्रीनींनी प्रतिसाद दिला व सर्वांच्या सहकार्यातून शिवशाही नागरी पतसंस्था शाखा मासरूळ येथे शाखा व्यवस्थापक तथा वर्गमित्र श्री सुखदेव नरवाडे यांच्या मार्गदर्शनातून पंधरा हजार रुपयांचा मुलीच्या नावे एफडी बनवला व वर्गमित्र कै.सुनील यांची पत्नी व मुले यांच्या हाती दिनांक 28 /12/2025 सुपूर्द केला.या सांत्वनपर भेटप्रसंगी श्री किरण उगले,भगवान भगत,अंबादास वाघ, सुरेश नरवाडे, उमेश निकम, सिद्धेश्वर भगत आदी वर्गमित्र उपस्थित होते.
वर्गमित्र-मैत्रिणींनी इथून पुढे असाच सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला व समाजापुढे आदर्श निर्माण केला यातून मित्राचे नाते सर्वश्रेष्ठ असते याचे दर्शन घडते.

Post a Comment
0 Comments